शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारकडून संविधानाचा वारंवार अवमान - ॲड. असीम सरोदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 14:17 IST

पैशाचा आणि सत्तेचा खेळ म्हणजे लोकशाही नव्हे

कवठे एकंद : सध्याचे मोदी सरकार हे संविधानाचा अवमान करणारे असल्याचे वारंवार दिसून आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील पक्ष फोडाफोडीचे प्रकार म्हणजे राजकीय व्यवस्थापनातील चुकीचे पायंडे आहेत. त्यांचा खेळ चालला आहे, याला लोकशाही म्हणायचे का, असा सवाल ॲड. असीम सरोदे यांनी कवठे एकंद (ता. तासगाव) येथे केला. कवठे एकंद येथील क्रांतिसिंह नाना पाटील ज्ञानप्रबोधिनीच्या व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना ॲड. सरोदे हे ‘सत्तेच्या खेळातील लोकशाही’ विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाराम माळी होते. प्रा. डॉ. बाबूराव गुरव, ॲड. सुभाष पाटील, प्रा. बाबूराव लगारे, ॲड. सतीश लोखंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.ॲड. सरोदे म्हणाले, सध्या राजकारणाचा आणि राजकारण्यांचा दर्जा घसरला आहे. मार्गदर्शन करण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे लोकशाही विरळ होत चालली आहे. माणसामाणसांमध्ये, जाती- धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याची प्रवृत्ती संविधानात नाही. परंतु, सध्याच्या कट्टरवादी सरकारने लोकशाहीचा खेळ सुरू केला आहे हे समजून घेतले पाहिजे. जाणीवपूर्वक संविधानाचे आणि लोकशाहीचे अवमूल्यन करण्याचा घाट घातला जात आहे. हे शहाण्या मतदारांनी ओळखले पाहिजे. कुणाला पाडायचं हे आता लोकांनी ठरवलं पाहिजे.ते पुढे म्हणाले, पैशाचा आणि सत्तेचा खेळ म्हणजे लोकशाही नव्हे. देशावर आणि संविधानावर प्रेम असणारी लोकं लोकशाहीत पाहिजेत. राजकारणाचा दर्जा घसरला आहे. त्यांना त्यांची जागा दाखवायला पाहिजे. लोकशाही मारून टाकण्याची प्रवृत्ती वाढत आहे. पण, लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी आपण विचार केला पाहिजे. लोकशाहीची नैतिकता सांभाळण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने सगज राहिले पाहिजे.

टॅग्स :SangliसांगलीAsim Sarodeअसिम सराेदेNarendra Modiनरेंद्र मोदी