पुराच्या पाण्यातून जाऊन कर्मचाऱ्याकडून जॅकवेलची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:27 IST2021-07-27T04:27:44+5:302021-07-27T04:27:44+5:30
ओळी : महापुराच्या पाण्यातून जाऊन महापालिका पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठा यंत्रणा कार्यान्वित केली. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापुराच्या पाण्यातून ...

पुराच्या पाण्यातून जाऊन कर्मचाऱ्याकडून जॅकवेलची दुरुस्ती
ओळी : महापुराच्या पाण्यातून जाऊन महापालिका पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठा यंत्रणा कार्यान्वित केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापुराच्या पाण्यातून जाऊन महापालिका पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी कर्नाळ रोडवरील जॅकवेलची दुरुस्ती केली. त्यामुळे मंगळवारपासून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. महापालिका कर्मचाऱ्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कृष्णा नदीला आलेल्या महापुरात महापालिकेच्या जॅकवेलच्या व्हीसीबी रूमपर्यंत पाणी आले. त्यामुळे महापालिकेने सांगली, कुपवाडचा पाणीपुरवठा बंद केला होता. आयुक्त नितीन कापडणीस यांनी नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, गेल्या दोन दिवसांपासून १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता.
सोमवारी दुपारी पाणीपुरवठा विभागाचे यांत्रिकी अभियंता अभय पोळ, वीजतांत्री हौसेराव पाटील, विनोद गोपी, हकीम पाथरवट, इर्शाद शेख, स्वप्निल माळी, किरण भोसले, राजू गायकवाड, गणपती शिंदे, पंप चालक जावेद सय्यद, प्रकाश कोळी, उदय शिंदे, बबन डोंगरे, वाहन चालक दिलावर जमादार, आयुब डफेदार यांनी पुराच्या पाण्यातून जात जॅकवेलची दुरुस्ती केली. सायंकाळी शहरातील पाण्याच्या टाक्या भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारपासून सांगली, कुपवाडचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.