दुधगाव बंधाऱ्याची दुरुस्ती लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:18 IST2021-07-08T04:18:03+5:302021-07-08T04:18:03+5:30
ओळ : दुधगाव (ता. मिरज) येथील वारणा नदीवरील बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे. लोकमत न्यूज नेटवर्क दुधगाव : दुधगाव ...

दुधगाव बंधाऱ्याची दुरुस्ती लवकरच
ओळ : दुधगाव (ता. मिरज) येथील वारणा नदीवरील बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दुधगाव : दुधगाव (ता. मिरज) येथील वारणा नदीवरील बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरु हाेईल, अशी माहिती जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांनी दिली.
दुधगाव बंधाऱ्याच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना भेटून बंधारा दुरुस्तीची मागणी केली होती. जयंत पाटील यांनी ताबडतोब बंधारा दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी पाठविण्याचे आदेश कोल्हापूर पाटबंधारे विभागाला दिले हाेते. यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुधगाव येथे येऊन पाहणी करून प्रस्ताव तयार करुन पुढील कार्यवाहीसाठी पुण्याच्या जलसंपदा विभागाला पाठवला. यानंतर जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांनी दुधगाव येथे भेट देऊन बंधाऱ्याची पाहणी केली. सप्टेंबरपर्यंत या कामाच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी सरपंच विकास कदम, ग्रामपंचायत सदस्य नीलेश हेरवाडे, संदीप आडमुठे, विलास आवटी, उत्तरभाग सोसायटीचे अध्यक्ष महेश पाटील व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.