अहिल्यादेवी होळकर चौकाची दुरुस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:26 IST2021-04-02T04:26:36+5:302021-04-02T04:26:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क संजयनगर : सांगली शहरातील शिंदे मळा येथील अहिल्यादेवी होळकर चौकाची दुरवस्था झाली आहे. त्याची दुरुस्ती करावी, ...

Repair Ahilya Devi Holkar Chowk | अहिल्यादेवी होळकर चौकाची दुरुस्त करा

अहिल्यादेवी होळकर चौकाची दुरुस्त करा

लोकमत न्यूज नेटवर्क

संजयनगर : सांगली शहरातील शिंदे मळा येथील अहिल्यादेवी होळकर चौकाची दुरवस्था झाली आहे. त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी धनगर समाज बहूद्देशीय संस्थेतर्फे तानाजी होनमाने यांनी केले आहे. याबाबत मागणीचे निवेदन महापौर दिग्विजय सूर्यवंशी व उपायुक्त राहुल रोकडे

निवेदनात म्हटले आहे की सांगली शहरांमध्ये सर्वात मोठा असणारा शिंदे मळ्यातील प्रभाग क्रमांक नऊमधील अहिल्यादेवी होळकर चौक आहे. या चौकात दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी बांधकामास तडे गेले आहेत. अनेक वेळा महापालिकेत निवेदने होऊ देऊनही हा चौक दुरुस्त होत नाही. याबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. म्हणून धनगर समाज बहूद्देशीय संस्थेतर्फे तानाजी होनमाने यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत निवेदन देण्यात आले.

यावेळी सुखदेव काळे, सुनीता मदने, विकास हाके, अमोल आटपाड, सागर कोळेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Repair Ahilya Devi Holkar Chowk