मिरजेतील गांधी चाैक पोलीस ठाण्याचे स्थलांतर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:32 IST2021-02-17T04:32:22+5:302021-02-17T04:32:22+5:30

मिरजेतील महात्मा गांधी चाैक पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र मोठे आहे. या ठाण्याच्या हद्दीत मिरज रेल्वेस्थानक, बसस्थानक, शहरी बस स्थानक ...

Relocate the Gandhi Chaik Police Station in Miraj | मिरजेतील गांधी चाैक पोलीस ठाण्याचे स्थलांतर करा

मिरजेतील गांधी चाैक पोलीस ठाण्याचे स्थलांतर करा

मिरजेतील महात्मा गांधी चाैक पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र मोठे आहे. या ठाण्याच्या हद्दीत मिरज रेल्वेस्थानक, बसस्थानक, शहरी बस स्थानक परिसरात रात्रीच्यावेळी अंधारात प्रवाशांना व उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मारहाण करून लुटण्याच्या घटना वारंवार सुरू आहेत. या परिसरात गांजासह अंमली पदार्थांची विक्री सुरू आहे. अंमली पदार्थांचे व्यसनी गुन्हेगार लुटमारीची कृत्ये करीत आहेत. सद्या पोलीस ठाणे औद्योगिक वसाहत रस्त्यावर एका कोपऱ्यात असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. रेल्वेस्थानक परिसरात पोलीस चौकी उभारण्याची गरज आहे. येथे बंद असलेल्या महापालिका जकात नाक्यात पोलीस चौकी सुरू करता येणे शक्य असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शहर सुधार समितीचे ॲड. ए. ए. काझी, जावेद पटेल, राकेश तामगावे, संतोष माने, मुस्तफा बुजरूक, जहीर मुजावर, बाळासाहेब पाटील यावेळी उपस्थित होते.

Web Title: Relocate the Gandhi Chaik Police Station in Miraj