शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Sangli: टेंभू उपसा सिंचन योजनेतून ऐन उन्हाळ्यात दिलासा, ७० हजार हेक्टर लाभक्षेत्र ओलिताखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 18:44 IST

प्रताप महाडिक कडेगाव : टेंभू उपसा सिंचन योजना ही कृष्णा नदीवरील महत्त्वाची सिंचन योजना असून, तिच्या माध्यमातून सांगली , ...

प्रताप महाडिककडेगाव : टेंभू उपसा सिंचन योजना ही कृष्णा नदीवरील महत्त्वाची सिंचन योजना असून, तिच्या माध्यमातून सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील तब्बल ८०४७२ हेक्टर क्षेत्र सिंचित होत आहे. सध्या ७० हजार हेक्टर शेतीलापाणी मिळत आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना संजीवनी ठरत असली, तरी पाणीपट्टी थकबाकी आणि वाढत्या वीजबिलांमुळे अडचणी येत आहेत. सध्या रब्बी हंगामातील आवर्तन सुरू असून, १७ मार्चपर्यंत ४.८६५ टीएमसी पाणी उचलण्यात आले आहे. जून २०२५ पर्यंत अजून ७.०० टीएमसी पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामात १.२१४ टीएमसी पाणी खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि सांगोला तालुक्यांना पिण्यासाठी देण्यात आले होते. सिंचन योजनेच्या वीजबिलाचा खर्च प्रचंड वाढला असून, जुलै २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत २९.१९ कोटी वीजबिल भरावे लागले आहे. जून २०२५ पर्यंत हा खर्च ६० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. शासन वीजबिलाची ८१% रक्कम देत असले, तरी उर्वरित १९ टक्के रक्कम पाणीपट्टीतून वसूल करावी लागणार आहे.

पाणीपट्टी थकबाकी, ७/१२ वर बोजा येणार!सध्या विभागाने फेब्रुवारीअखेर ७.७३ कोटी रुपये वसूल केले असले, तरी मार्च अखेर २३.४५ कोटी रुपयांचे वसुलीचे लक्ष्य ठेवलं आहे. मात्र, शेतकऱ्यांनी ऊस बाहेरील कारखान्यांना गाळपासाठी दिल्याने पाणीपट्टी वसुली रखडली आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटिसा पाठवण्याची कारवाई सुरू झाली असून, पाणीपट्टी न भरल्यास ७/१२ उताऱ्यावर थकबाकीचा बोजा नोंदवला जाणार आहे.

..अन्यथा पाणीपुरवठ्यावर परिणामटेंभू प्रकल्प हा अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी असून, त्याचा लाभ घेण्यासाठी पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे. शासनानेही वाढत्या वीजबिलाच्या खर्चावर तोडगा काढावा, अशी मागणी शेतकरी व प्रकल्प लाभधारकांकडून होत आहे. पाणीपट्टी वसुलीची समस्या सुटली नाही, तर भविष्यातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीfarmingशेती