धरणातील विसर्ग कमी झाल्याने दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:32 IST2021-09-16T04:32:48+5:302021-09-16T04:32:48+5:30
सांगली : जिल्ह्यातील पावसाने उघडिप दिली असून धरण पाणलोट क्षेत्रांमध्येही पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे कोयना व वारणा ...

धरणातील विसर्ग कमी झाल्याने दिलासा
सांगली : जिल्ह्यातील पावसाने उघडिप दिली असून धरण पाणलोट क्षेत्रांमध्येही पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे कोयना व वारणा धरणातील विसर्ग बुधवारी कमी करण्यात आला. कृष्णा नदीच्या पातळीत आता मंदगतीने वाढ होत आहे.
सांगली जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवस पावसाने हजेरी लावली होती. वारणा व कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कोयना धरणातून ४९ हजारावर तर वारणा धरणातून साडेसहा हजारावर क्युसेकने विसर्ग सुरू होता. मंगळवारी त्यात घट झाली. कोयनेतून आता २० हजार २०० तर वारणा धरणातून २ हजार ८९८ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळी गेल्या चोवीस तासांत दोन फुटांनी वाढ झाली आहे.
आणखी काही प्रमाणात नदीपातळीत वाढ होऊन पुन्हा पाणीपातळी घटण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात येत्या सहा दिवसांत अंशत: ढगाळ वातावरण व काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. बुधवारी सांगली शहरासह जिल्ह्यात पावसाने उघडिप दिली.
चौकट
जिल्ह्यातील नदीपातळी (फूट)
बहे ९
ताकारी २६. ७
भिलवडी २५.५
आयर्विन सांगली २१.६
अंकली २५.९
म्हैसाळ ३३.६