आष्टा परिसरात कोरोना लसीकरणासाठी महा ई-सेवा केंद्रात नोंदणीची सोय : दीक्षान्त देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:24 IST2021-04-03T04:24:03+5:302021-04-03T04:24:03+5:30
आष्टा : आष्टा शहर व परिसरात कोरोना लसीकरण करण्यासाठी महा ई-सेवा केंद्रात नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, ...

आष्टा परिसरात कोरोना लसीकरणासाठी महा ई-सेवा केंद्रात नोंदणीची सोय : दीक्षान्त देशपांडे
आष्टा : आष्टा शहर व परिसरात कोरोना लसीकरण करण्यासाठी महा ई-सेवा केंद्रात नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त तहसीलदार दीक्षान्त देशपांडे यांनी दिली.
देशपांडे म्हणाले, आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयासह बागणी, वाळवा, बावची आरोग्य केंद्रात मोफत लसीकरण करण्यात येत आहे तर आष्टा येथील गावडे व आदित्य हॉस्पिटल येथे अल्प किमतीत लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणासाठी आष्टा येथील अप्पर तहसील कार्यालय सेतू केंद्रासह राज, फिनिक्स, माणकेश्वर या महा ई-सेवा केंद्रासह बावची येथील समर्थ केंद्र बागणी, काकाचीवाडी, कोरेगाव व वाळवा येथील महा ई-सेवा केंद्रात कोरोना लस घेणाऱ्या व्यक्तींची नोंदणी करण्यात येणार आहे. याचा ४५ वर्षे वयावरील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार दीक्षान्त देशपांडे यांनी केले आहे.