शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

प्रादेशिक पाणी योजनांना घरघर

By admin | Updated: November 18, 2014 23:23 IST

अनुदान बंदच : ४४ गावांतील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती

अमित काळे: तासगाव ::गावपातळीवर पिण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांबाबत ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रडतखडत सुरू असणाऱ्या या योजनांवर हजारो कुटुंबांची पाण्यासाठी भिस्त आहे. योजनेचे उत्पन्न व येणारा खर्च याचा मेळ व्यवहारात बसत नसल्यामुळे ‘योजना बंद’ पडण्याचा त्रास सर्वसामान्यांना भोगावा लागतो. प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांचे अनुदान बंद झाल्यापासून योजनांची गाडी रुळावरून घसरली. यावर कायमस्वरूपी उपाययोजना न करता जुजबी मलमपट्टी करून पाणी पुरवठा सुरू आहे. कवठेमहांकाळ, येळावी, मणेराजुरी योजनांची वीजबिल थकबाकी १० कोटींच्या घरात आहे. १० कोटींची थकबाकी असूनही वीज वितरण कंपनीने यांचा विजेचा पुरवठा सुरू ठेवला आहे. मात्र पैसे भरलेच जात नाहीत, असे निदर्शनास आल्यावर वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे सुमारे ४४ गावांचा पुरवठा बंद झाला. सध्या प्रत्येक कुटुंबाला १ हजार ८०० रुपये पाणीपट्टी आकारली जाते. सार्वजनिक कनेक्शनला ५०० रुपये आकार आहे. तासगावच्या अखत्यारितील सर्व योजनांची १०० टक्के वसुली झाली तरी, ती १ कोटी २० लाखांपर्यंत जाते व महिन्याची वीज बिले २५ ते २७ लाखांपर्यंत येतात. वर्षाला वीज बिलेच ११ कोटी ५८ लाखांपर्यंतची आहेत. याशिवाय योजनेचा इतर खर्चही आहे. एकत्रितरित्या हा खर्च ४० लाखांपर्यंतचा आहे. मुळात पाणीपट्टी १०० टक्के वसूल होत नाही. ५५ ते ६० टक्क्यांपर्यंत वसुली आहे. अपवादात्मक परिस्थितीत १०० टक्के वसुलीचे गाव आहे. पाणी पुरवठ्यासाठी वीज वितरण कंपनीने बिलाची आकारणी कमी दराने करावी, अशी पाणी पुरवठा विभागाची मागणी आहे. हा दर कमी होत नाही, तोवर वाढीव वीजबिले येणार आहेत. योजनेच्या देखभाल, दुरुस्तीचे अनुदानही शासनाकडून मिळत नाही.वीज बिलाच्याबाबतीत जेवढे बिल भरले जाईल, त्याच्या ५० टक्के अनुदान मिळत असते. पण इथे वीज बिल भरायचाच प्रश्न असल्याने अनुदान केव्हा मिळणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रादेशिक योजनांबाबतीत शासनाने ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. ज्या गावांमध्ये पाण्याचे स्थानिक स्त्रोत उपलब्ध आहेत, ज्यांनी पूरक योजना तयार केल्या आहेत तिथे मोठी समस्या जाणवत नाही. परंतु ज्या गावामध्ये काहीच पर्याय नाही, त्यांनी पाणी कुठून प्यायचे, हा प्रश्न आहे. त्यांना टँकरशिवाय पर्यायच नाही.वीज बिल थकले म्हणून कनेक्शन तोडून योजना बंद करण्याचा हा पहिलाच प्रकार घडला, असे नाही. योजना बंद करण्यात आल्या होत्या.पाण्यासाठी कमी दराने आकारणी हवीमुळात पाणीपट्टी १०० टक्के वसूल होत नाही. ५५ ते ६० टक्क्यांपर्यंत सरासरी वसुली आहे. अपवादात्मक परिस्थितीत १०० टक्के वसुलीचे गाव आहे. पाणी पुरवठ्यासाठी वीज वितरण कंपनीने कमी दराने आकारणी करावी, अशी पाणी पुरवठा विभागाची मागणी आहे. हा दर कमी होत नाही, तोवर वाढीव वीजबिले येणार आहेत. योजनेच्या देखभाल, दुरुस्तीचे अनुदानही शासनाकडून मिळत नाही.