विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात कपात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:21 IST2021-06-02T04:21:12+5:302021-06-02T04:21:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कात कपात करावी, अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या ...

Reduce student tuition fees | विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात कपात करा

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात कपात करा

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कात कपात करावी, अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खानापूर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी देण्यात आला.

या मागणीचे निवेदन खानापूरचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना देण्यात आले. मंगळवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विटा शहराध्यक्ष सत्यजित पाटील यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड, तालुकाध्यक्ष नईम मुलाणी, आकाश चव्हाण, प्रवीण गायकवाड, शुभम जाधव, रोहित शितोळे, कौस्तुभ माने उपस्थित होते.

फोटो - ०१०६२०२१-विटा-एन.सी.पी. : विटा येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी सत्यजित पाटील, संतोष गायकवाड, नईम मुलाणी, आकाश चव्हाण उपस्थित होते.

Web Title: Reduce student tuition fees