वृक्षलागवड व संवर्धनामुळे प्रदूषणास आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:23+5:302021-07-05T04:17:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : वृक्षलागवड व संवर्धनामुळे प्रदूषण न होता निसर्गातूनच ऑक्सिजनचा पुरवठा मुबलक मिळेल व आरोग्य उत्तम ...

Reduce pollution due to tree planting and conservation | वृक्षलागवड व संवर्धनामुळे प्रदूषणास आळा

वृक्षलागवड व संवर्धनामुळे प्रदूषणास आळा

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : वृक्षलागवड व संवर्धनामुळे प्रदूषण न होता निसर्गातूनच ऑक्सिजनचा पुरवठा मुबलक मिळेल व आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल, असे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनी केले.

आरळा (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळा सिद्धार्थनगर येथे महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी म्हणाल्या की, वृक्षलागवड काळाची गरज आहे. यावेळी शाळेतल्या प्रांगणात विविध रोपांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक मोहन पवार, शिक्षिका लताराणी पाटील, अध्यक्षा नेत्रा झाडे, गौतम झाडे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो : ०४ शिराळा १

ओळ : आराळा (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळा सिद्धार्थनगर येथे वृक्षारोपण करताना प्रदीपकुमार कुडाळकर,मधुवंती धर्माधिकारी,मोहन पवार व इतर मान्यवर

Web Title: Reduce pollution due to tree planting and conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.