बांबवडेत बिबट्याच्या हल्ल्यात रेडकू ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:42 IST2020-12-15T04:42:21+5:302020-12-15T04:42:21+5:30

वाटेगाव : बांबवडे (ता. शिराळा) येथील ताटे पाणंदशेजारील संजय बापू बनसोडे यांच्या गोठ्यातील दोन वर्षांच्या रेडकावर बिबट्याने हल्ला ...

Redku killed in a leopard attack in Bombay | बांबवडेत बिबट्याच्या हल्ल्यात रेडकू ठार

बांबवडेत बिबट्याच्या हल्ल्यात रेडकू ठार

वाटेगाव : बांबवडे (ता. शिराळा) येथील ताटे पाणंदशेजारील संजय बापू बनसोडे यांच्या गोठ्यातील दोन वर्षांच्या रेडकावर बिबट्याने हल्ला करून त्याला जागीच ठार केले. हा हल्ला रविवारी रात्री नऊच्या सुमारास झाला. यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताटे वस्ती येथे संजय बापू बनसोडे यांचा जनावरांचा गोठा आहे. नेहमीप्रमाणे गोठ्यातील कामे आवरून ते सायंकाळी घरी गेले. रात्री दहाच्या सुमारास बिबट्याने गोठ्यातील रेडकावर हल्ला करून त्याला ठार केले. हल्ला केल्याची माहिती शेजारील लोकांनी बनसोडे यांना दिली. त्यांनी वस्तीवर धाव घेतली असता, दोन वर्षांचे रेडकू रक्ताच्या थारोळ्यात धडपडताना दिसले.

या घटनेची माहिती शिराळा वन विभागाला कळविण्यात आली. वनरक्षक देवकी तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, शेजारच्या शेतात लहान-मोठ्या दोन बिबट्यांच्या पायांचे ठसे निदर्शनास आले. यावरून हा हल्ला दोन बिबट्यांनी केला असल्याची माहिती शेतकऱ्यांना दिली. सध्या या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Redku killed in a leopard attack in Bombay