ताकारी योजनेचे आवर्तन १० डिसेंबरपर्यंत सुरू;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:07 IST2020-12-05T05:07:59+5:302020-12-05T05:07:59+5:30
लाभक्षेत्रातील शेतीपिकांना पाण्याची गरज आहे. ऊसतोड कार्यक्रम आणि ताकारी योजनेचे आवर्तन यात समन्वय ठेवण्यात येईल. मात्र आवर्तन तातडीने ...

ताकारी योजनेचे आवर्तन १० डिसेंबरपर्यंत सुरू;
लाभक्षेत्रातील शेतीपिकांना पाण्याची गरज आहे. ऊसतोड कार्यक्रम आणि ताकारी योजनेचे आवर्तन यात समन्वय ठेवण्यात येईल. मात्र आवर्तन तातडीने सुरू करा, अशा सूचना आमदार मोहनराव कदम यांनी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांना दिल्या. यावर १० डिसेंबरला आवर्तन सुरू करण्यात येईल, असे डवरी यांनी सांगितले.
डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखाना येथे ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील काही शेतकऱ्यांनी आ. मोहनराव कदम यांची भेट घेऊन, ताकारी योजनेचे आवर्तन सुरू करण्याची गरज असल्याचे सांगितले. योजनेच्या लाभक्षेत्रात सर्वत्र ऊसतोड सुरू आहे. त्यामुळे आवर्तनास विलंब होत आहे, असेही शेतकऱ्यांनी मोहनराव कदम यांना सांगितले.
मोहनराव कदम यांनी शेतकऱ्यांसमक्ष ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. मोहनराव कदम म्हणाले, चालू वर्षातील रब्बी हंगामातील पाहिले आवर्तन करणे गरजेचे आहे. यामुळे ज्या भागात आवर्तनाचे पाणी देण्यात येणार आहे, त्या भागातील ऊसतोड काही दिवस बंद ठेवण्यात येईल. त्यादृष्टीने नियोजन करणे गरजेचे आहे. संबंधित कारखाना प्रशासनास सूचना करून वितरिकानिहाय नियोजन करा, अशा सूचना कार्यकारी अभियंता डवरी यांना दिल्या आहेत.