आटपाडीत आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:24 IST2021-04-19T04:24:40+5:302021-04-19T04:24:40+5:30

पडळकर म्हणाले, आटपाडी तालुक्यात शुक्रवारी २५० आरटीपीसीआर चाचण्या केल्या. त्यापैकी ८५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. १६ आरोग्य उपकेंद्रांत ११ ...

Recruit health workers in Atpadi | आटपाडीत आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करा

आटपाडीत आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करा

पडळकर म्हणाले, आटपाडी तालुक्यात शुक्रवारी २५० आरटीपीसीआर चाचण्या केल्या. त्यापैकी ८५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. १६ आरोग्य उपकेंद्रांत ११ ठिकाणी परिचारिकांची पदे रिक्त आहेत. तालुक्यात एमडी डॉक्टर नाही. अँटिजेन किट आटपाडी तालुक्यात गेले आठ दिवस उपलब्ध नव्हते. चाचणी केल्यानंतर मिरज सिव्हिल रुग्णालयात तपासणीसाठी स्वॅब पाठविला जातो. त्याचा अहवाल यायला दोन दिवस लागतात. तोपर्यंत रुग्ण दोन दिवस बाहेर फिरतो. त्यामुळे संसर्ग वाढतो. त्यासाठी जिल्ह्याचा आढावा घेऊन खासगी प्रयोगशाळांमध्ये तपासणी करण्याची व्यवस्था करा. जिल्ह्यात ऑक्सिजनची परिस्थिती गंभीर आहे. व्हेंटिलेटरची व्यवस्था करा, अशा मागण्या त्यांनी केल्या.

या वेळी माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, जयवंत सरगर, विष्णू अर्जुन उपस्थित होते.

Web Title: Recruit health workers in Atpadi