अनेक आघातातून सावरत दोन मावस भाऊ झाले सीए
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:28 IST2021-09-25T04:28:43+5:302021-09-25T04:28:43+5:30
विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : येथील सूर्यकांत शहा यांचे दोन नातू एकाच वेळी सी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले ...

अनेक आघातातून सावरत दोन मावस भाऊ झाले सीए
विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : येथील सूर्यकांत शहा यांचे दोन नातू एकाच वेळी सी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. जयवर्धन शहा ( रा. किर्लोस्करवाडी ) तर साहिल शहा ( रा. कोल्हापूर ) या दोघांनी विविध अडचणींचे टप्पे पार करत हे यश संपादन केले आहे.
स्थापत्य अभियंता सूर्यकांत शहा व माजी ग्रामपंचायत सदस्या विजयमाला यांच्या कन्या संगीता यांचा किर्लोस्करवाडी येथील सचिन शहा यांचेशी ; तर शर्मिला यांचा कोल्हापूर येथील संजय शहा यांच्याशी विवाह झाला. सचिन यांनी मुलगा जयवर्धन यास सी. ए. करायचे म्हणून पुण्यात शिकायला पाठवले. मात्र यानंतर सचिन यांचा अपघाती मृत्यू झाला. संगीता याने संकटांना तोंड देत जयवर्धन, किर्तीवर्धन या दोन्ही मुलांना शिकवून स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न केला. जयवर्धन वडिलांच्या मृत्यूनंतर अनेक संकटांना तोंड देत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षण पूर्ण केले. आपला व्यवसाय सुरू करून कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला. शिक्षण व्यवसाय करत त्याने सी. ए.च्या परीक्षेत यश मिळवले.
कोल्हापूर येथील विजय शहा, सूर्यप्रभा शहा यांनी आपला नातू साहिल सी. ए. व्हावा म्हणून त्यास पुण्यास पाठवले. मात्र या काळातच आजीचा मृत्यू झाला. या दु:खातून सावरत असतानाच वडील संजय यांचा अपघात झाला. ते जवळपास दीड महिना रुग्णालयात उपचारासाठी राहिले होते. वडिलांचा अपघात झाल्यावर साहिलने पुण्यातून सरळ कोल्हापूर गाठले. या दोन्ही घटनांचा आघात पेलत असतानाचा आजोबा विजय शहा यांचा मृत्यू झाला. या घटनांनी सर्व परिस्थितीच बदलून गेली. अशातच साहिल सी. ए. झाला. कोणताही क्लास नाही ; स्वतः अभ्यास करून त्याने हे यश मिळवले.
या यशानंतर दोघांचेही सूर्यकांत शहा, विजयमाला शहा, चांदणी शहा, शैलेश शहा, स्वाती शहा, प्रदीप शहा, छाया शहा, विपुल शहा, लीना शहा यांनी अभिनंदन केले.