शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: पोलिस भासवून दागिने लुटणाऱ्यास अटक, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:41 IST

गुन्हे अन्वेषणची कारवाई 

सांगली : पोलिस असल्याचे सांगून दागिने लुटणाऱ्या रेकॉर्डवरील आंतरराज्य गुन्हेगार कासिम सलीम इराणी (वय २७, रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर, पुणे, सध्या रा. जयसिंगपूर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून सोन्याची साखळी, अंगठी, स्पोर्टस् बाईक असा ६ लाख १५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.दि. ३१ मे रोजी आटपाडी ते भिवघाट रस्त्यावरून नारायण तातोबा चव्हाण-पाटील (वय ७६, रा. यमाजी पाटलाचीवाडी, ता. आटपाडी) हे दुचाकीवरून निघाले होते. तेव्हा दुपारी चारच्या सुमारास दोघांनी त्यांना अडवले. आम्ही पोलिस आहोत, पुढे लुटालूट सुरू आहे. तुमच्याजवळील दागिने काढून खिशात ठेवा असे त्यांनी सांगितले. नारायण पाटील हे सोनसाखळी व अंगठी रूमालात बांधत असताना एकाने मी तुम्हाला व्यवस्थित बांधून देतो असे सांगून हातचलाखीने रुमालात दागिने न ठेवता दगड ठेवला. पुढे गेल्यानंतर पाटील यांनी रूमाल बघितल्यानंतर आतमध्ये दगड ठेवल्याचे पाहून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक या गुन्ह्याचा तपास करताना हवालदार सागर लवटे यांना संशयित कासिम इराणी याची माहिती मिळाली. त्याला जयसिंगपूर येथून ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर त्याने साथीदार अबुजर इराणी (रा. वासन, जि. ठाणे) याच्या मदतीने आटपाडी येथील वृद्धाची सोनसाखळी, अंगठी काढून घेतल्याचे सांगितले. दीड महिन्यापूर्वी जत ते सांगली रस्त्यावर एका वृद्धाला पोलिस असल्याचे सांगून गळ्यातील सोनसाखळी व अंगठी हातचलाखीने काढून घेतल्याची कबुली दिली.दोघांकडून ६ लाख १५ हजाराचे दागिने व स्पोर्टस् बाईक जप्त केली. त्याला आटपाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, तानाजी सावंत, सहायक निरीक्षक पंकज पवार, अंमलदार सागर लवटे, संदीप गुरव, सतीश माने, नागेश खरात, दऱ्याप्पा बंडगर, अनिल कोळेकर, अमर नरळे, महादेव नागणे, सागर टिंगरे, मच्छिंद्र बर्डे, उदयसिंह माळी, संदीप नलावडे, विक्रम खोत, केरूबा चव्हाण, सुनील जाधव, अभिजीत पाटील, अजित पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.

आंतरराज्य गुन्हेगारकासिम इराणी हा आंतरराज्य गुन्हेगार आहे. त्याच्याविरूद्ध कोल्हापूर, पुणे, पश्चिम बंगालमध्ये मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.