अडीच महिन्यातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:51 IST2021-03-04T04:51:28+5:302021-03-04T04:51:28+5:30

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढच होत आहे. सोमवारी गेल्या अडीच महिन्यांतील सर्वाधिक बाधितांची नोंद झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ...

Record of the highest number of coronaviruses in a month and a half | अडीच महिन्यातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद

अडीच महिन्यातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढच होत आहे. सोमवारी गेल्या अडीच महिन्यांतील सर्वाधिक बाधितांची नोंद झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

महापालिका क्षेत्रात सांगलीत ९ तर मिरजेत ४ रुग्ण आढळले. जिल्ह्यात सर्वाधिक १० रूग्ण आटपाडी तालुक्यात आढळले आहेत तर कडेगाव, तासगाव, जत तालुक्यात प्रत्येकी तीन रुग्ण आढळले आहेत.

आरोग्य विभागाने सोमवारी आरटीपीसीआर अंतर्गत ५६३ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात २९ जण पॉझिटिव्ह आढळले तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ७९१ जणांच्या तपासणीतून १० जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.

उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येतही वाढ होत असून सध्या १८७ जण उपचार घेत आहेत त्यातील ४८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ४१ जण ऑक्सिजनवर तर ७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यांतील प्रत्येकी एकाला कोरोनाचे निदान झाले आहे.

Web Title: Record of the highest number of coronaviruses in a month and a half