शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत साडेपाच लाख योगप्रेमींकडून विक्रमी भक्तियोग, तीन विश्वविक्रमांची नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 17:05 IST

सांगली : जागतिक योगदिनी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील योगप्रेमींनी एकाच वेळी वारकरी तालावर योगसाधना करत साडेपाच लाख योगप्रेमींनी ...

सांगली : जागतिक योगदिनी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील योगप्रेमींनी एकाच वेळी वारकरी तालावर योगसाधना करत साडेपाच लाख योगप्रेमींनी तीन विश्वविक्रमाला गवसणी घातली. सांगली जिल्हा परिषदेने हा विश्वविक्रमी भक्तियोग साधला. त्यांना चितळे डेअरी आणि विश्व योगदर्शन केंद्र यांची साथ लाभली. प्रत्यक्ष व दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी होऊन सर्वाधिक व्यक्तींनी केलेला हा भक्तियोग वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवला गेला.येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आयोजित ‘भक्तियोग.. तालवारकरी, योगकरी आरोग्यपंढरी’ या जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे होते. ते म्हणाले, शारीरिक व मानसिकदृष्ट्या भक्कम राहण्यासाठी योग साधना आवश्यक असून, यामध्ये सातत्य ठेवावे.जिल्ह्यातील १६०० हून अधिक केंद्रांवर झालेल्या योगसाधना कार्यक्रमात जवळपास साडेपाच लाख योगप्रेमी सहभागी झाले. ग्रामीण भागातील योगप्रेमी व महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या भक्तियोगाची वर्ल्ड बुक, आशिया बुक व इंडिया बुकमध्ये नोंद झाली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून हा अत्यंत सुंदर व देखणा कार्यक्रम झाल्याबद्दल मंत्री गोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच चितळे उद्योग समूह व गिरीश चितळे, विश्व योग केंद्र, वारकरी संप्रदाय यांच्यासह अनेक संघटना, शाळा, महाविद्यालये आदींनी सहभाग नोंदवला.यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, चितळे डेअरीचे गिरीश चितळे, विश्वयोग दर्शन केंद्राचे योग विशारद बाळकृष्ण चिटणीस, अंजली चिटणीस, हर्षद गाडगीळ, शैलेश कदम व सहकाऱ्यांनी योगसाधनेचे प्रात्यक्षिक सादर केले.एकाचवेळी एका तालावर समान योगसहभागी योगप्रेमींनी एकाच वेळी एकाच तालावर समान योग रचनांसहित विश्व योग केंद्रांवरील विहित योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगासने केली. मूळ कार्यक्रमापूर्वी भक्तिगीतांचे सादरीकरण झाले. अभिषेक तेलंग, कीर्ती पेठे यांनी गीतांचे सादरीकरण केले. त्यांना भास्कर पेठे, प्रशांत भाटे, अक्षय कुलकर्णी, परेश पेठे यांनी संगीत साथ दिली. व्यापारी मनोहर सारडा यांच्या वतीने भक्तीरसाचा झाला. उपस्थितांनी झिम्मा-फुगडीचा ठेका धरला.