शिराळा तालुक्यात दिवसात विक्रमी ७८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:29 IST2021-04-23T04:29:12+5:302021-04-23T04:29:12+5:30

शिराळा : शिराळा तालुक्यात गुरूवारी विक्रमी ७८ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यामध्ये गतवर्षीचे हॉटस्पॉट असलेले ...

Record 78 patients per day in Shirala taluka | शिराळा तालुक्यात दिवसात विक्रमी ७८ रुग्ण

शिराळा तालुक्यात दिवसात विक्रमी ७८ रुग्ण

शिराळा : शिराळा तालुक्यात गुरूवारी विक्रमी ७८ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यामध्ये गतवर्षीचे हॉटस्पॉट असलेले मणदूर आता पुन्हा एकदा ‘हॉटस्पॉट’ बनू लागले आहे.

यामध्ये मणदूर (११), मिरुखेवडी (१०), औढी (६), कोकरूड, रेड प्रत्येकी (५) मालेवाडी (४), शिराळा, चिखली, कांदे, सांगाव, शिरशी प्रत्येकी (३), बिळाशी, काळूनद्रे, पनुम्बरे वारून प्रत्येकी (२) आंबेवाडी, बेलेवाडी, भागाईवाडी, बिऊर, चरण, गिरजवडे, कोंडाईवाडी, कोरेगाव, लाडेगाव, मांगले, मेणी, शिरसवाडी, उपवळे, वाकुर्डे बुद्रुक, चव्हाणवाडी, सोंडोली प्रत्येकी (१) अशी रुग्णसंख्या आहे.

तालुक्यात ५१९ रुग्ण उपचाराखाली असून, यामध्ये मिरज कोविड रुग्णालयात (१), शिराळा कोविड सेंटर (९), शिराळा कोविड रुग्णालयात (३५ ), कोकरूड कोविड रुग्णालय (८), स्वस्तिक हॉस्पिटल (६), खासगी रुग्णालयात (१), गृह अलगीकरणामध्ये (४६९) रुग्ण उपचार घेत आहेत. दुसऱ्या लाटेत आत्तापर्यंत पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Web Title: Record 78 patients per day in Shirala taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.