अनधिकृतपणे तोडलेले वीज कनेक्शन तत्काळ पूर्ववत जोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:30 IST2021-08-28T04:30:10+5:302021-08-28T04:30:10+5:30
जत : कुंभारी (ता. जत) येथे महावितरण कंपनीने अनधिकृतपणे तोडलेले वीज कनेक्शन तत्काळ पूर्ववत जोडून मिळावीत अन्यथा महावितरण ...

अनधिकृतपणे तोडलेले वीज कनेक्शन तत्काळ पूर्ववत जोडा
जत : कुंभारी (ता. जत) येथे महावितरण कंपनीने अनधिकृतपणे तोडलेले वीज कनेक्शन तत्काळ पूर्ववत जोडून मिळावीत अन्यथा महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोपण करू, असा इशारा कुंभारीतील युवा नेते नाथा पाटील यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. महावितरणने वीज बिल भरण्यास शेतकऱ्यांना एक महिन्याची मुदत द्यावी, असेही ते म्हणाले.
महावितरणने कुंभारीतील वीज कनेक्शन अनधिकृतपणे तोडले आहेत. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर हा मोठा अन्याय आहे. कोराेना महामारीचा कहर वाढत आहे. अशा वेळी शासन आणि प्रशासन नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करीत आहेत. मात्र, महावितरणने थकीत वीज बिलासाठी शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता पुरवठा बंद केला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना एक महिन्याची मुदतवाढ देऊन वीज बिलामध्ये हप्ते पाडून द्यावेत, अन्यथा आम्ही महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढू व तिथे उपोषण करू, असा इशारा नाथा पाटील व शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
270821\img_20210827_134859.jpg
अनाथिकृतपणे तोडलेली वीज कनेक्शने तात्काळ पुर्ववत जोडून मिळावीत