पाटील, देसाई यांना मार्गदर्शक म्हणून मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST2021-03-13T04:48:06+5:302021-03-13T04:48:06+5:30
मिरज : मिरजेतील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयातील इंग्लिश विभागप्रमुख प्रा. डॉ. लीलावती पाटील व समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. ...

पाटील, देसाई यांना मार्गदर्शक म्हणून मान्यता
मिरज : मिरजेतील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयातील इंग्लिश विभागप्रमुख प्रा. डॉ. लीलावती पाटील व समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सतीश देसाई यांना शिवाजी विद्यापीठाने एम. फिल. व पीएच. डी.च्या मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे.
लीलावती पाटील या गेली तीस वर्षे इंग्रजीच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत असून, एक व्यासंगी प्राध्यापिका म्हणून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत शाेधनिबंध सादर केले आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या इंग्लिश विषयाच्या अभ्यासक्रमाच्या अनेक पुस्तकांत त्यांनी लेखन केले आहे. प्रा. डॉ. सतीश देसाई सध्या शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे व एनएसएसचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागाच्या स्वयंअध्ययन साहित्याचेही त्यांनी लेखन केले आहे. महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ. सुभाष शेळके यांनी दोघांचे अभिनंदन केले. मिरज तहसीलदार डी. एस. कुंभार यांच्याहस्ते दोघांचा सत्कार करण्यात आला.