नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निकला अधिकृत सुविधा केंद्राची मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:19 IST2021-07-01T04:19:32+5:302021-07-01T04:19:32+5:30
पेठनाका : व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटला राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी अधिकृत सुविधा केंद्र म्हणून ...

नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निकला अधिकृत सुविधा केंद्राची मान्यता
पेठनाका : व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटला राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी अधिकृत सुविधा केंद्र म्हणून मान्यता दिली असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. महेश जोशी यांनी दिली.
तंत्रशिक्षण संचालनालयाकडून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया दि. ३० जून २०२१ पासून सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थी नजीकच्या सुविधा केंद्रामध्ये जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतात किंवा स्वत: ऑनलाईन प्रक्रिया करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतो.
दहावीनंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी सुविधा केंद्रामार्फत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी व सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. जोशी यांनी केले आहे.