बहे येथे विविध मान्यवरांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST2021-07-14T04:31:10+5:302021-07-14T04:31:10+5:30
बहे (ता. वाळवा) येथे अशोकराव देशमुख व नामदेव कारंडे यांच्याहस्ते रमेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. लोकमत न्यूज नेटवर्क ...

बहे येथे विविध मान्यवरांचा सत्कार
बहे (ता. वाळवा) येथे अशोकराव देशमुख व नामदेव कारंडे यांच्याहस्ते रमेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : बहे (ता. वाळवा) येथे बहे सर्व सेवा सहकारी संस्थेच्या वतीने अध्यक्ष अशोकराव थोरात व उपाध्यक्ष नामदेव कारंडे यांच्याहस्ते विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
रमेश बाजीराव पाटील यांची सांगली जिल्हा वाहतूक निरीक्षकपदी, सुश्मिता जाधव यांची महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी, हणमंतराव शिवाजीराव पाटील यांचा वाळवा तालुका हरभरा पीक स्पर्धेत तिसरा नंबर व आनंदा लोहार यांची सहाय्यक दुय्यम निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील, संचालिका सुवर्णा पाटील, महिला राष्ट्रवादी उपाध्यक्षा वैशाली पाटील, शिवाजीराव पाटील, जयदीप पाटील, बाबासाहेब मुल्ला, संभाजी पाटील, भानुदास मोहिते, हणमंत पाटील, सीताराम हुबाले, शंकर खरात, हणमंत पाचुब्रे, रोहित तोरस्कर, सुभाष आरबुणे, मुनीर मुल्ला, शिवाजी पाटील, सुधीर रोकडे उपस्थित होते. जयदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संजय हुबाले यांनी आभार मानले.