हरोलीत सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:47 IST2021-02-06T04:47:25+5:302021-02-06T04:47:25+5:30
सेवानिवृत्त अधिकारी रघुनाथ पवार यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले की, ...

हरोलीत सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार
सेवानिवृत्त अधिकारी रघुनाथ पवार यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले की, सरकारने माजी सैनिकांसाठी आरोग्य, पेन्शन, मुलामुलींचे शिक्षण व विवाह याबाबतीत अनेक सोयी-सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, माहितीअभावी अनेक सैनिक वंचित राहतात.
त्या सर्व सेवा-सुविधांचा लाभ माजी सैनिकांना मिळवून देण्याच्या उद्देशाने ही संघटना स्थापन केली आहे.
यावेळी सुभेदार बाळासाहेब दयाळ, उपाध्यक्ष लक्ष्मण खराडे, सचिव रावसाहेब शेंडे, सर्जेराव कदम, श्रीकांत सुर्वे, हरिश्चंद्र पाटील, बाळासाहेब बनसोडे, तुकाराम हुलवान, दत्तात्रय साखरे, तुकाराम बनसोडे, अण्णासाहेब भोसले, शिवाजी पाटील उपस्थित होते.
फोटो ओळी : हरोली येथील सैनिक वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला.