नेर्ले येथे पदाधिकाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:22 IST2021-01-09T04:22:01+5:302021-01-09T04:22:01+5:30

नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे भाजयुमोच्यावतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. रयत क्रांती संघटनेच्या प्रदेश ...

Reception of office bearers at Nerle | नेर्ले येथे पदाधिकाऱ्यांचा सत्कार

नेर्ले येथे पदाधिकाऱ्यांचा सत्कार

नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे भाजयुमोच्यावतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. रयत क्रांती संघटनेच्या प्रदेश प्रवक्तेपदी माजी सरपंच लालासाहेब पाटील, भाजप उद्योग सेलच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी उद्योजक धनाजीराव पाटील, दलित महासंघ सांगली जिल्हा अध्यक्षपदी विकास बल्लाळ यांची निवड झाली आहे. त्यांचा जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती जगन्नाथ माळी व नगरसेवक कपिल ओसवाल यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सरगम मुल्ला यांनी प्रास्ताविक केले. जागरनाथ पाटील यांनी आभार मानले. यावेळी कृष्णाचे संचालक गिरीश पाटील, बंडा जाखले, जयवंत विरकर, कुमार पाटील, प्रशांत पाटील, राजेंद्र निकम, सोमाजी विरकर, राहुल बनसोडे, विकास कनप, सचिन दळवी, बालेखान नदाफ, इलाही पठाण, अमोल पाटील उपस्थित होते.

फोटो : ०८०१२०२१-आयएसएलएम-नेर्ले सत्कार न्यूज

ओळ : नेर्ले (ता. वाळवा) येथे भाजयुमोच्यावतीने माजी सरपंच लालासाहेब पाटील यांचा सत्कार सभापती जगन्नाथ माळी, कपिल ओसवाल यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी सरगम मुल्ला, जागरनाथ पाटील उपस्थित होते.

Web Title: Reception of office bearers at Nerle