वाळू तस्करांकडून तेरा लाखांचा दंड वसूल
By Admin | Updated: January 2, 2015 00:17 IST2015-01-01T23:20:38+5:302015-01-02T00:17:29+5:30
महसूलची धडक कारवाई : आटपाडी तालुक्यातील अठ्ठावीस जणांवर कारवाई

वाळू तस्करांकडून तेरा लाखांचा दंड वसूल
आटपाडी : गेल्या दहा वर्षात महसूल कर्मचाऱ्यांनी प्रथमच डिसेंबर महिन्यात २८ वाळू तस्करांवर कारवाई करुन १0 लाख ७७ हजार ७८0 रुपये व दंडासह एकूण तब्बल १३ लाख ३१0 रुपये वाळू तस्करांकडून वसूल केले आहेत. महसूल विभागाची पथके २४ तास तैनात केल्याने वाळू तस्करांची पंचाईत झाली आहे.
महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केलेल्या वाहन मालकांची नावे आणि त्यांच्याकडून दंडासह वसूल केलेली रक्कम अशी- ज्ञानू हणमंत जाधव (रा. आटपाडी)- १000३५ रुपये, रणधीर देवडकर (रा. आटपाडी)- २५00 रुपये, अमर चव्हाण (रा. आटपाडी)- २५00 रुपये, आबा बापू खताळ (रा. बनपुरी)- ३0 हजार, तानाजी वाघमोडे (रा. घाणंद)- ३0 हजार, पोपट जमदाडे (रा. पलूस)- ५0 हजार, धोंडिराम शिंत्रे (ता. तासगाव)- ५0 हजार, उमेश चावरे (रा. इचलकरंजी)- ५0 हजार, पोपट जमदाडे (रा. पलूस)- ६६ हजार ६५५, बिलाल खाटीक (रा. कवठेमहांकाळ)- ६६ हजार ६५५, राजू घाटगे (रा. कवठेमहांकाळ)- ६६ हजार ६५५, मोहन खरात (रा. सिध्देवाडी)- १ लाख ३३ हजार ३१0, सत्यपाल भगत (रा. खानापूर)- १ लाख ३३ हजार ३१0, सम्राट कोरे (रा. यळगूड)- ९९ हजार ९६५, श्रीकांत मिसाळ (रा. आटपाडी)- ३0 हजार ९६५, श्रीमंत मिसाळ (रा. आटपाडी)- ३0 हजार, संतोष देशमुख (रा. देशमुखवाडी)- ३0 हजार, बाळू माने (रा. मिरज)- ५0 हजार, दीपक भोसले (रा. पुजारवाडी)- ३0 हजार, जयदीप भोसले (रा. नेलकरंजी)- २0 हजार ३५, बजरंग इंगवले - २ हजार ३५, दिलीप बालटे (रा. आटपाडी)- ३0 हजार, गुलाब चव्हाण (रा. पुजारवाडी)- ३0 हजार, प्रशांत जुगदर (रा. जांभुळणी)- ३0 हजार, तानाजी जाधव (रा. वलवण)- ३0 हजार, अवधूत यादव (रा. खानापूर)- ६६ हजार ६५५, प्रमोद आटपाडकर (रा. विठलापूर)- ३0 हजार. असा एकूण १३ लाख ३१0 रुपये महसूल वसूल करण्यात
आला आहे.
तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांच्यासह मंडल अधिकारी बी. पी. यादव, अतुल सोनवणे, एस. ए. शिंदे, जे. के. बागवान, नीलेश भांबुरे, मल्हारी करांडे, गावकामगार तलाठी माणिकराव देशमुख, व्ही. एस. पाटील, आर. एम. कोळी, ए. जे. बनसोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. (वार्ताहर)