रेशन दुकानदारांनी पावती देणे बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:07 IST2020-12-05T05:07:39+5:302020-12-05T05:07:39+5:30
सांगली : रेशनिंगचे धान्य लाभार्थ्यांना सुरळीतपणे मिळण्यासाठी ग्रामपातळीवर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली दक्षता कमिटी स्थापन केली आहे. या समितीने अधिक ...

रेशन दुकानदारांनी पावती देणे बंधनकारक
सांगली : रेशनिंगचे धान्य लाभार्थ्यांना सुरळीतपणे मिळण्यासाठी ग्रामपातळीवर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली दक्षता कमिटी स्थापन केली आहे. या समितीने अधिक सक्षमपणे काम करणे आवश्यक आहे. रास्तभाव दुकानदारांविरोधातील तक्रारीत तथ्य असल्यास त्या रास्त भाव दुकानदाराचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल, असे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान, रास्त भाव दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकास धान्य दिल्यानंतर पावती देणे बंधनकारक असल्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा यादीतील कार्डधारकांना जर आपल्या कार्डावर किती धान्य मिळते, ते पहायचे
असेल तर संकेतस्थळावर जाऊन आपला बाराअंकी रेशनकार्ड नंबर नोंदवावा व रेशन कार्डवर किती व्यक्तींची ऑनलाईन नोंद आहे व किती धान्य मिळते, याबाबत माहिती मिळवावी. यासह रेशन दुकानदारांविरोधात कोणतीही तक्रार आल्यास व त्यात तथ्य आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी सांगितले.