शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने उमेदवारी डावलल्यास बंडखोरी, जयश्रीताई पाटील यांचा सांगली विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 17:59 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून माझ्या उमेदवारीला हिरवा कंदील

सांगली : मागील विधानसभा निवडणुकीत मीच काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी पुढाकार घेतला होता. माझ्या कार्यकर्त्यांनीही त्यांचे मनापासून काम केले. या वर्षी मी इच्छुक असल्यामुळे पृथ्वीराज पाटील यांनी थांबावे आणि मला पाठिंबा द्यावा, असे आवाहन काँग्रेसच्या नेत्या व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील बुधवारी पत्रकार परिषदेत केले. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही माझ्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखविला आहे, असेही त्या म्हणाल्या.जयश्रीताई पाटील म्हणाल्या, मदन पाटील यांचे निधन झाल्यामुळे २०१९ ची विधानसभा निवडणूक मी लढणार नाही, असे पक्षाला स्पष्ट सांगितले होते. त्यानंतर सर्वांच्या चर्चेतूनच पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी मिळाली. पक्षाचा आदेश समजून मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले. पृथ्वीराज पाटील यांनीही “आता मदत करा, पुढे मी तुम्हाला मदत करणार आहे,” असे स्पष्ट केले होते. दिलेल्या शब्दानुसार पृथ्वीराज पाटील यांनी मला पाठिंबा देऊन विजयासाठी मदत करावी. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुंबईत दोन दिवसांपूर्वी भेट घेतली. पटोले यांनीही तुम्ही कामाला सुरुवात करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा शब्द दिला आहे. खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचाही माझ्या उमेदवारीसाठी पाठिंबा आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील ३० नगरसेवक आणि कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. म्हणूनच काँग्रेस पक्षाकडून निश्चित मला उमेदवारी मिळणार आहे. त्यादृष्टीने माझे काम सुरू आहे. कार्यकर्त्यांनीही सांगली विधानसभा मतदारसंघात काम सुरू ठेवले आहे.

काँग्रेसने उमेदवारी डावलल्यास बंडखोरीकाँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मागील विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस नेत्यांनी सांगली विधानसभेच्या उमेदवारीचा शब्द दिला आहे. यातूनही काँग्रेसने उमेदवारी डावलल्यास बंडखोरी करून सांगली विधानसभा निवडणूक लढविणार आहे. तसेच जिंकूनही दाखविणार, असा विश्वास जयश्रीताई पाटील यांनी व्यक्त केला.

२५ टक्के महिलांना उमेदवारीकाँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीत महिलांना २५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सांगली विधानसभा निवडणुकीत मला उमेदवारी देऊन पक्षाने दिलेला शब्द पाळावा, अशी मागणीही जयश्रीताई यांनी केली.

पोस्टरबाजी करून उमेदवारी मिळत नाहीकाँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्यांच्या कामाला महत्त्व दिले जाते. केवळ पोस्टरबाजी करून उमेदवारी मिळत नाही, असा टोलाही जयश्रीताई यांनी पृथ्वीराज पाटील यांचे नाव न घेता लगावला. तसेच आम्ही आमच्या कर्तृत्वावर उमेदवारी मागत आहोत, असेही स्पष्ट केले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाcongressकाँग्रेस