वाटेगावात बिबट्याच्या हल्ल्यात रेडी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:28 IST2021-08-23T04:28:50+5:302021-08-23T04:28:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथील सिद्देवाडी परिसरातील रफिक अब्बास मुल्ला यांच्या जनावरांच्या गोठ्यातील एक वर्षाच्या ...

वाटेगावात बिबट्याच्या हल्ल्यात रेडी ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथील सिद्देवाडी परिसरातील रफिक अब्बास मुल्ला यांच्या जनावरांच्या गोठ्यातील एक वर्षाच्या रेडीवर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार मारले. बिबट्याच्या दहशतीने शेतकरी व शेतमजूर भयभीत झाले आहेत. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
यापूर्वी बिबट्याने वाटेगाव येथे दि. ७ ऑगस्ट रोजी रामोशी दरा व दि. ६ रोजी पुदेवाडी फाट्यावरील रामचंद्र मारुती हिंगणे यांच्या घरासमोर बांधलेल्या कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केले होते. शनिवारी (दि. २१) रात्री सिद्देवाडी येथील सिद्देश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या मुल्ला यांच्या शेडमध्ये बांधलेल्या रेडीवर हल्ला करून ठार केले. येथून जवळ असलेल्या वाटेगाव येथील कुंभार मळा, औताडे मळा तलाव परिसरातील माने वस्तीवरील कुत्र्यांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. या घटनांमुळे परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. घटनास्थळी वनरक्षक दीपाली सागावकर यांनी भेट देऊन पंचनामा केला.