शबेबरातचे दुवा पठण घरातूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:16 IST2021-03-30T04:16:01+5:302021-03-30T04:16:01+5:30
सांगली : दि जमियत मदिना मस्जिद आणि कब्रस्थान ट्रस्ट, सांगली जिल्ह्याच्यावतीने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत यंदा मुस्लिम बांधवांनी शबेबरात ...

शबेबरातचे दुवा पठण घरातूनच
सांगली : दि जमियत मदिना मस्जिद आणि कब्रस्थान ट्रस्ट, सांगली जिल्ह्याच्यावतीने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत यंदा मुस्लिम बांधवांनी शबेबरात (बड़ीरात)चे दुवा पठण घरातूनच केले.
कोरोनामुळे यंदा या परंपरेत खंड पडला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गर्दी टाळण्यासाठी व दक्षता म्हणून २८ मार्च रोजी शबेबरात (बड़ीरात)ला ट्रस्टचे अध्यक्ष सलीमभाई बिडीवाले व सचिव जब्बार बारसकर यांनी मुस्लिम बांधवांना आवाहन केले होते. त्यादिवशी सांगली मार्केट यार्ड कब्रस्थान गेटचे दरवाजे बंद ठेवण्यात आले. सर्व बाधवांनी ईशा नमाजनंतर कब्रस्थान येथे न जाता आपल्या आपल्या घरीच दुवा व प्रार्थना पठण करण्यात यावी, असे आवाहन
ट्रस्टने केले होते. त्यास प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी घरीच दुवा पठण केले. कोरोनामुळे प्रथमच ही परंपरा खंडित झाली.