शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सांगली जिल्हा बँक गैरव्यवहाराची पुन्हा चौकशी, जयंत पाटलांना दणका; माजी अध्यक्ष म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 17:42 IST

चौकशीला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दिलेली स्थगिती शिंदे- फडणवीस सरकारने उठवली.

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गैरव्यवहाराच्या चौकशीला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दिलेली स्थगिती शुक्रवारी शिंदे- फडणवीस सरकारने उठवली. याबाबतचे लेखी आदेश सहकार विभागाचे विशेष कार्य अधिकारी श्रीकृष्ण वाडेकर यांनी सहकार आयुक्तांना दिले आहेत. नियमबाह्य कर्ज वाटप,  नोकरभरती, इमारत बांधकाम, कर्जाचे निर्लेखनासह अन्य तक्रारींची चौकशी होणार आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील यांना राज्य सरकारने दणका दिल्याचे स्पष्ट झाले.जिल्हा बँकेतील कारभाराबाबत स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी स्वतंत्रपणे सहकार आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली होती. याप्रकरणी सहकार आयुक्तांनी कलम ८१ नुसार चाचणी लेखापरीक्षण अथवा कलम ८३ नुसार सखोल चौकशीचे आदेश यापूर्वी दिले होते. या चौकशीला २३ सप्टेंबर २०२१ रोजी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली. दोन महिन्यांपूर्वी भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी सहकारमंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन जिल्हा बँकेच्या गैरव्यवहाराची चौकशीची स्थगिती उठविण्याची मागणी केली होती.शिंदे- फडणवीस सरकारमधील विशेष कार्य अधिकारी श्रीकृष्ण वाडेकर यांनी चौकशी पुन्हा सुरू करण्याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यानुसार पुन्हा चौकशीचे आदेश सहकार आयुक्तांना देण्यात आले आहेत. जिल्हा बँक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ताब्यात आहे. यामुळे चौकशीला विशेष महत्त्व आहे.पारदर्शी कारभार, राजकीय हेतूने कारवाई : पाटीलजिल्हा बँकेतील संपूर्ण व्यवहार नियमाप्रमाणे केले आहेत. यापूर्वीही ईडी, आयकर विभाग आणि नाबार्डकडून चौकशी झाली होती. त्या चौकशीमध्ये काहीही निष्पन्न झालेले नाही. नोकरभरतीबाबत जिल्हा उपनिबंधकांनी क्लीन चिट दिली आहे. उच्च न्यायालयानेही नोकरभरतीबाबतची याचिका फेटाळली होती.  

शासन व सहकार विभागाच्या मान्यतेने शाखा नूतनीकरण, इमारती बांधकाम, नोटा मोजण्याचे मशीन खरेदी झाली आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी झाली असून, कुठेही गैरकारभार आढळलेला नाही. आता पुन्हा राजकीय हेतूने चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याला बँक कायदेशीर उत्तर देईल, असे बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक दिलीपतात्या पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलbankबँकEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस