कणदूर, शिराळे खुर्दला कोरोनाचा पुन्हा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:16 IST2021-03-30T04:16:12+5:302021-03-30T04:16:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : शिराळा तालुक्यातील कणदूर, शिराळे खुर्द गावात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे. कोरोनाबाबत ...

कणदूर, शिराळे खुर्दला कोरोनाचा पुन्हा शिरकाव
लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : शिराळा तालुक्यातील कणदूर, शिराळे खुर्द गावात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे. कोरोनाबाबत सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन कणदूर व शिराळे खुर्द ग्रामपंचायतींनी केले आहे.
शिराळा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच, शिराळे खुर्द, कणदूर गावात गेल्या दोन दिवसांत कोरोनाचे प्रत्येकी दोन रुग्ण सापडले आहेत. तरीही परिसरातील गावातील असंख्य नागरिक कोरोनाबाबत बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. सागाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका यांनी सर्व्हे चालू केला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत म्हणून सर्व नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा व आरोग्य विभागास सहकार्य करावे तसेच कोरोना लसीकरणास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन कणदूर व शिराळे खुर्द ग्रामपंचायतींनी केले आहे.