शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वीसपेक्षा कमी पटाच्या शाळांवर पुन्हा गडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 11:28 IST

School, Education Sector, Sangli राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा घाट शासनाने पुन्हा घातला आहे. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर हजारो विद्यार्थ्यांना दूरची शाळा गाठावी लागणार आहे. राज्यातील आठ ते दहा हजार शाळा या निर्णयामुळे बंद होणार आहेत.

ठळक मुद्देवीसपेक्षा कमी पटाच्या शाळांवर पुन्हा गडांतर आठ ते दहा हजार शाळांना फटका : प्राथमिक शिक्षक समितीचा विरोध

सांगली : राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा घाट शासनाने पुन्हा घातला आहे. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर हजारो विद्यार्थ्यांना दूरची शाळा गाठावी लागणार आहे. राज्यातील आठ ते दहा हजार शाळा या निर्णयामुळे बंद होणार आहेत.कोरोनामुळे सध्या ऑनलाईन शाळा सुरू आहेत. वीसपेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करण्याचा विचार शासनाने पुन्हा सुरू केला आहे. कमी पटसंख्येच्या शाळेचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्यात यावे, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सध्या शाळांची माहिती घेण्याचे काम सुरू असून महिनाभरात त्याचा अहवाल तयार होईल. एकट्या नाशिक जिल्ह्यातीलच ३०० पेक्षा अधिक शाळा बंद होण्याची शक्यता आहे. इतरही जिल्ह्यातील शेकडो शाळा आहेत.विद्यार्थ्यांची संख्या कमी असलेली छोटी गावे, वस्त्या या ठिकाणची शाळा बंद झाल्यास मुलांच्या वाट्याला पायपीट येणार आहे. काही वेळा नकाशावर दुसऱ्या शाळेपर्यंतचे अंतर कमी दिसत असले तरी प्रत्यक्षात शाळेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग कठीण असतो. वाहनांची सोय नसते. त्यामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, शिवाय शिक्षकांच्या समायोजनेचा प्रश्न आणखी बिकट होईल, अशी भीती शिक्षक संघटनांना आहे.शिक्षक समितीचा विरोधसंघटनेचे राज्य संघटक सयाजीराव पाटील म्हणाले की, कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णय ग्रामिण, दुर्गम भागातील विद्यार्थांना शिक्षणाच्या प्रवाहातुन दुर करणारे व त्यांचे शैक्षणिक भविष्य अंधःकारमय करणारे आहे. तरी शासनाने कोणतीच शाळा बंद करु नये अशी मागणी शिक्षक समितीने केली आहे. याबाबत शासनाला निवदेनही दिल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रSangliसांगली