कामेरीत कोरोनाचा पुन्हा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:43+5:302021-06-09T04:34:43+5:30

कामेरी : कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी कामेरी येथील १३, तर गाताडवाडी येथील १ असे १४ नवे कोरोनाबाधित ...

Re-eruption of corona in Kameri | कामेरीत कोरोनाचा पुन्हा उद्रेक

कामेरीत कोरोनाचा पुन्हा उद्रेक

कामेरी : कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी कामेरी येथील १३, तर गाताडवाडी येथील १ असे १४ नवे कोरोनाबाधित सापडले. दिवसभरात ३३ चाचण्या करण्यात आल्या. यापैकी १९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे यांनी दिली.

कामेरीत १ फेब्रुवारीपासून ७ जूनअखेर दुसऱ्या लाटेत बाधितांची एकूण ३९४ संख्या झाली आहे. ६० रुग्ण उपचार घेत आहेत. कामेरी येथील बाधित रुग्ण रस्त्यावर फिरत असल्याच्या तक्रारी वारंवार ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडे येत होत्या. यामुळे शनिवारी दक्षता समितीच्या सदस्यांनी स्वत: बधितांच्या घरी भेट देऊन खात्री केली. त्यांनाही काही रुग्ण घरी नसल्याचे आढळून आले. यापुढे असे झाल्यास पोलीस कारवाई करण्याचा इशारा दक्षता समितीने दिला. मात्र लोकांचा रस्त्यावरील विनामास्क वावर व होम आयसोलेशनच्या रुग्णांचे घराबाहेर फिरणे यामुळे वाढणारा संसर्ग कसा राेखायचा, असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासन व दक्षता समितीसमाेर आहे.

Web Title: Re-eruption of corona in Kameri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.