नेर्लेत रयत क्रांतीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:26 IST2021-05-13T04:26:18+5:302021-05-13T04:26:18+5:30
नेलेॅ : नेर्ले (ता. वाळवा) येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीने मराठा आरक्षणाबाबत ‘माझे अंगण हेच माझे रणांगण’ आंदोलन झाले. ...

नेर्लेत रयत क्रांतीचे आंदोलन
नेलेॅ : नेर्ले (ता. वाळवा) येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीने मराठा आरक्षणाबाबत ‘माझे अंगण हेच माझे रणांगण’ आंदोलन झाले. माजी सरपंच व रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते लालासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.
रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, आ.सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर हे आंदोलन सुरू झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले होते, परंतु महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षण धुळीला मिळविले. यापुढे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत रयत क्रांती संघटना शांत बसणार नाही, असे मत लालासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रदीप पाटील, जयदीप पाटील, राहुल पाटील, भाग्यश्री चव्हाण, संकेत चव्हाण, शुभम रोकडे यांनी आंदोलनात सहभागी झाले होते.