बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक; तरीही मृत्युसत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST2021-05-30T04:22:16+5:302021-05-30T04:22:16+5:30

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी मृत्यूंची संख्यावाढ कायम ...

The rate of recovery is higher than the incidence; Still the death season continues | बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक; तरीही मृत्युसत्र सुरूच

बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक; तरीही मृत्युसत्र सुरूच

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी मृत्यूंची संख्यावाढ कायम आहे. शनिवारी १०७८ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर१२०४ जण कोरोनामुक्त झाले. परजिल्ह्यांतील तिघांसह जिल्ह्यातील ३७ जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या वाढत असून दिवसात १७ जण आढळले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील ३७ जणांचा मृत्यू झाला असून त्यात सांगली ६, मिरज ५, मिरज तालुक्यात ७, वाळवा तालुक्यात ६, खानापूर, जत तालुक्यातील प्रत्येकी तीन, तासगाव, शिराळा प्रत्येकी २, आटपाडी, कडेगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी दिवसभरात आरटीपीसीआरअंतर्गत २४४९ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ४७४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर रॅपिड अँटिजन टेस्टच्या ४२४८ जणांच्या तपासणीतून ६७८ जणांना बाधा झाली आहे.

जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या घटली असून सध्या १२ हजार ५५२ जण उपचार घेत आहेत. त्यात १८७८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १६२९ जण ऑक्सिजनवर, तर २४९ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला असून नवे ७४ जण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

चाैकट

कोरोनामुक्तांची संख्या लाखांवर

जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येने लाखांचा टप्पा ओलांडला असतानाच शनिवारी जिल्ह्यातील कोरोनावर यशस्वीपणे मात केलेल्या रुग्णांच्या संख्येनेही लाखाचा टप्पा पूर्ण केल्याने दिलासा मिळाला आहे.

चौकट

म्युकरमायकोसिसचे नवे १७ रुग्ण

कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येत असली तरी म्युकरमायकोसिसचा विळखा वाढताना दिसत आहे. शनिवारी केवळ एका दिवसात १७ जणांना बाधा झाली असून एकूण रुग्णांची संख्या १३१ वर पोहोचली आहे, तर शनिवारी या आजाराने दोघांंचा मृत्यू झाला आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ११६५१४

उपचार घेत असलेले १२५५२

कोरोनामुक्त झालेले १००५८८

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३३७४

शनिवारी दिवसभरात

सांगली १०२

मिरज ५८

वाळवा १६९

मिरज तालुका १५२

पलूस १०७

शिराळा १०१

कडेगाव ८९

जत ८५

कवठेमहांकाळ ६४

तासगाव ४५

आटपाडी ३८

Web Title: The rate of recovery is higher than the incidence; Still the death season continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.