शेतकरी आंदोलनास पाठिंब्यासाठी राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते दिल्लीला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:31 IST2021-09-09T04:31:59+5:302021-09-09T04:31:59+5:30
मिरज : केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकरी संघटनांतर्फे गेले नऊ महिने दिल्लीत सुरू असलेल्या ...

शेतकरी आंदोलनास पाठिंब्यासाठी राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते दिल्लीला रवाना
मिरज : केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकरी संघटनांतर्फे गेले नऊ महिने दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. आंदोलनास पाठिंब्यासाठी राष्ट्रीय संघटक सदाशिव मगदूम यांच्या नेतृत्वाखाली युवक-युवती मिरजेतून दिल्लीला रवाना झाले.
शेतकरी आंदोलन अधिक जोमाने सुरू राहावे, यासाठी राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते १६ सप्टेंबरपर्यंत दिल्लीत गाजीपूर-दिल्ली सीमेवर राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होणार आहेत. राष्ट्रसेवा दलाचे कलापथक प्रबोधन, प्रभात फेरी, परिसर स्वच्छता करणार आहे.
सदाशिव मगदूम, आशुतोष देशमुखे, किरण कांबळे, शाहिस्ता मुल्ला, कोमल मगदूम, बाबासाहेब नदाफ, रोहित कुरणे, महेश बेटगेरी, अविनाश चिगरी, साधना शिंदे, राजेश शर्मा असे पंधराजण मिरज रेल्वेस्थानकातून निजामुद्दीन एक्स्प्रेसने दिल्लीला रवाना झाले.