शहरं
Join us  
Trending Stories
1
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
2
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
3
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
4
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
5
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
6
VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
7
मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
8
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
9
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
10
Marnus Labuschagne : पिंक बॉल टेस्टमधील बेस्ट बॅटर! मार्नस लाबुशेनची विश्वविक्रमी कामगिरी
11
Bigg Boss 19: बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रणित मोरेला जाहीर पाठिंबा; नेटकरी म्हणाले, 'मराठी कार्ड...'
12
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
13
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
14
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
15
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
16
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
17
शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करण्याचे मिशन, रणवीर सिंहचा 'धुरंधर' नक्की कसा आहे? वाचा रिव्ह्यू
18
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
19
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
20
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

‘मी आठ महिन्यांची गर्भवती आहे, मला सोडा’... 'ती' ओरडत राहिली, पण नराधमांना दया आली नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 18:11 IST

आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर आठजणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

तासगाव : आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर 8 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगलीतील तुरची फाटा (तालुका तासगाव) येथील ही संतापजनक घटना आहे. पीडित महिलेच्या पतीला कारमध्ये डांबून ठेवून आठ जणांनी  तिच्यावर  सामूहिक बलात्कार केला. मंगळवारी (31 जुलै) मध्यरात्रीची ही घटना आहे. याप्रकरणी एकाही संशयिताचे नाव व पत्ता शोधण्यात यश न आल्याने या गुन्ह्याचा छडा लावणे तासगाव पोलिसांसमोर एक आव्हान बनले आहे.

सागर, मुकुंद माने, जावेद खान, विनोद अशी अपूर्ण चार संशयितांची नावे सध्या तरी पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहेत, तर अन्य चार जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागालाही तपासाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे पथक तासगावमध्ये तळ ठोकून आहे. संशयित तुरची परिसरातील असावेत, असा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी पुढील तपासाला दिशा दिली आहे.

पीडित महिला माण (सातारा) तालुक्यातील आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती पतीसह उदरनिर्वाहासाठी तुरची फाट्यावर स्थायिक झाली आहे. त्यांनी हॉटेल व्यवसाय सुरु केला आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये कामासाठी विवाहित जोडप्याच्या शोधात ते होते. त्यांनी काही ग्राहकांना, असे एखादे जोडपे आहे का, हे पाहण्यास सांगितले होते. मंगळवारी रात्री संशयित मुकुंद माने याने पीडित महिलेच्या पतीशी मोबाइलवर संपर्क साधून, ‘तुम्हाला हॉटेल कामासाठी पाहिजे असलेले जोडपे मिळाले आहे, त्यांना भेटण्यासाठी तुम्ही तुरची फाट्यावर या’, असे सांगितले. तसेच या जोडप्यास अ‍ॅडव्हान्स देण्यास 20 हजार रुपये घेऊन येण्यासही सांगितले.

पीडित महिला व तिचा पती तुरची फाटा येथील एका चाळीजवळ पैसे घेऊन गेले असता, मुकुंद माने याने त्याच्यासोबत असलेल्या सागर यास ‘या दोघांना मारा’ असे सांगितले. त्यानुसार सागरने या दाम्पत्यास प्लास्टिकच्या पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पीडित महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, दीड तोळ्याची सोनसाखळी व वीस हजाराची रोकड काढून घेतली. यादरम्यान, दुचाकीवरून आणखी चौघे संशयित तेथे आले. त्यांनी पीडित महिलेच्या पतीला बाहेर उभ्या असलेल्या मोटारीमध्ये डांबून ठेवले व महिलेला तेथीलच एका खोलीत नेले.संशयितांची दाम्पत्याला दमदाटीपीडित महिलेने अशी विनवणी त्यांना केली. मात्र, आठही संशयितांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिच्या पतीला मोटारीतून तिच्याजवळ आणून सोडले. संशयितांनी या दाम्पत्याला ‘इथून गप निघून जायचे. पोलिसात जाऊ नका, तुमचे कोणी ऐकणार नाही. मी इथलाच आहे’, असे सांगून दमदाटी केली. रात्री उशिरा दाम्पत्याने तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक उमेश दंडिले तपास करीत आहेत.

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारSangliसांगलीCrimeगुन्हा