तासगावात शॉक देऊन युवतीवर बलात्कार

By Admin | Updated: October 21, 2016 01:22 IST2016-10-21T01:22:58+5:302016-10-21T01:22:58+5:30

तरुणास अटक : डान्स क्लासच्या बहाण्याने सहा वर्षांपूर्वी झाली होती भेट

Rape of a young woman with a shock in a tornado | तासगावात शॉक देऊन युवतीवर बलात्कार

तासगावात शॉक देऊन युवतीवर बलात्कार

तासगाव : डान्स क्लासच्या बहाण्याने ओळखीचा फायदा घेत तासगावातील तरुणाने इचलकरंजीतील तरुणीवर सातत्याने बलात्कार केल्याचा तसेच वेळोवेळी तिला विजेचे झटके देऊन मारहाण केल्याचा प्रकार तासगावमध्ये गुरुवारी उघडकीस आला. याप्रकरणी मयूर दत्तात्रय पवार (रा. स्टेट बँकेजवळ, काशिपुरा गल्ली, तासगाव) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर
मयूर पवार याचा भाऊ चैतन्य दत्तात्रय पवार याने आत्महत्या केल्याने खळबळ
उडाली आहे.
पीडित युवती व मयूर पवार या दोघांची ओळख सहा वर्षांपूर्वी एका डान्स स्पर्धेत झाली होती. त्यानंतर वेगवेगळ्या डान्स स्पर्धेत त्यांची भेट होत राहिली. दीड वर्षापूर्वी मयूरने युवतीच्या घरी जात ‘आपण तासगावमध्ये डान्स क्लास काढू’, असे सांगून तासगावला येण्यास भाग पाडले. दर शनिवारी व रविवारी क्लास असल्याने संबंधित युवती क्लासमध्येच रहात होती. सहा महिन्यांपूर्वी मयूरने संबंधित युवतीला क्लासमध्ये एकटी पाहून जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. यानंतर त्याने वारंवार संशयावरून संबंधित युवतीला मारहाण केली.
आठ दिवसांपूर्वी संबंधित युवतीचे लग्न ठरले. मात्र मयूरने ‘तुझ्या व्हिडीओ क्लिप्स पाहिजे असतील तर तू मला सांगलीत भेटायला ये’, अशी धमकी दिली. यानंतर युवती घाबरून त्याला सांगलीत भेटण्यास आली. मात्र मयूरने तिला जबरदस्ती तासगावला डान्स क्लासमध्ये आणून विजेचे झटके दिले. संबंधित प्रकारानंतर युवतीने स्वत:ची सुटका करून घेत तेथून पळ काढला. त्यानंतर घरच्यांसोबत तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यानंतर मयूर पवार यास अटक करण्यात आली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एम. एच. शेख करीत आहेत.

 

Web Title: Rape of a young woman with a shock in a tornado