शिराळा तालुक्यात महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:21 IST2021-05-29T04:21:43+5:302021-05-29T04:21:43+5:30

कोकरूड : शिराळा तालुक्ळातील एका गावात २४ वर्षीय महिलेच्या विनयभंगप्रकरणी तीनजणांविरुद्ध कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, याबाबत ...

Rape of a woman in Shirala taluka | शिराळा तालुक्यात महिलेचा विनयभंग

शिराळा तालुक्यात महिलेचा विनयभंग

कोकरूड : शिराळा तालुक्ळातील एका गावात २४ वर्षीय महिलेच्या विनयभंगप्रकरणी तीनजणांविरुद्ध कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, याबाबत स्वतः पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिलेचा बेकरी व्यवसाय आहे. संशयित सचिन बाळकृष्ण पाटील (वय २९), छाया बाळकृष्ण पाटील (५७, रा. आरळा, ता. शिराळा) व मोहन ऊर्फ विलास मारुती पाटील (५२, रा. पणुंब्रे, ता. शिराळा) तिच्या बेकरीमध्ये पाव आणण्यासाठी गेले होते. यावेळी फिर्यादीच्या पतीने पाव बनवत नसल्याचे सांगितले. संशयित सचिन व मोहन पाटील यांनी विनयभंग केला. छाया पाटील यांनी फिर्यादीस व त्यांच्या पतीस शिवीगाळ केली. सचिन व मोहन यांनी फिर्यादीच्या पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली . अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ करीत आहेत.

Web Title: Rape of a woman in Shirala taluka