सांगलीत भाजी विक्रेत्या महिलेवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:24 IST2021-01-18T04:24:54+5:302021-01-18T04:24:54+5:30
सांगली : शहरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेवर भाजीपाला व्यापाऱ्याने बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणी जहांगीर शेहनशहा महात ...

सांगलीत भाजी विक्रेत्या महिलेवर बलात्कार
सांगली : शहरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेवर भाजीपाला व्यापाऱ्याने बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणी जहांगीर शेहनशहा महात (वय ३०, ज्ञानेश्वर कॉलनी, श्यामरावनगर, सांगली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला ही भाजीपाला विक्रेती तर संशयित कांदा-बटाटा व्यापारी आहे. पीडित महिला त्याच्याकडून विक्रीसाठी भाजीपाला घेत असे. नोव्हेंबरमध्ये उधारीच्या पैशावरून महात याने पीडितेला त्रास देण्यास सुरुवात केली होती. नोव्हेंबरमध्ये जबरदस्तीने दोन वेळा बलात्कार केला. अखेर पीडितेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा त्यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.