कवठेमहांकाळमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST2021-09-19T04:27:17+5:302021-09-19T04:27:17+5:30

पीडित अल्पवयीन मुलगी कुटुंबासह तालुक्यातील एका गावात राहते. संबंधित तरुण हा सोलापूर जिल्ह्यातील असून कामाच्या निमित्ताने अल्पवयीन मुलीच्या ...

Rape of a minor girl in Kavthemahankal | कवठेमहांकाळमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

कवठेमहांकाळमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पीडित अल्पवयीन मुलगी कुटुंबासह तालुक्यातील एका गावात राहते. संबंधित तरुण हा सोलापूर जिल्ह्यातील असून कामाच्या निमित्ताने अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाशी त्याची ओळख झाली. ओळखीचा फायदा घेत त्याने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. २०१८ ते २०२१ या कालावधीत त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

पीडित अल्पवयीन मुलीने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता ताे उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. आपली फसवणूक झाल्याचे पीडित मुलीच्या लक्षात आले. तिने पोलिसात धाव घेऊन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तक्रारीची तत्काळ दखल घेत दगडू शेळके याच्याविराेधात गुन्हा दाखल केला. त्याला अटक करून न्यायालयासमाेर उभे केले. न्यायालयाने त्यास २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. अधिक तपास साहाय्यक निरीक्षक सागर गोडे करीत आहेत.

Web Title: Rape of a minor girl in Kavthemahankal