इस्लामपुरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:19 IST2021-07-20T04:19:47+5:302021-07-20T04:19:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शहरातील उपनगरात राहणाऱ्या १८ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. या ...

इस्लामपुरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरातील उपनगरात राहणाऱ्या १८ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. या अत्याचारातून पीडित मुलगी सात महिन्यांची गर्भवती झाली होती. कराड येथील खासगी रुग्णालयात तिचा गर्भपात केल्यानंतर स्त्रीजातीचे अर्भक मृत झाले. त्यातून या घटनेला वाचा फुटली.
याबाबत कराड येथील महिला सामाजिक कार्यकर्तीने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत (पूर्ण नाव नाही) या संशयिताविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर २०२० या कालावधीत पीडित मुलीवर संशयिताने शारीरिक अत्याचार केला आहे.
अनिकेत याने पीडित मुलीच्या अज्ञानाचा व भोळेपणाचा फायदा उठवत तिच्यावर बलात्कार केला. ही बाब आई-वडिलांना सांगेन, अशी धमकी देत त्याने पाच ते सहा वेळा शारीरिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक अनिल जाधव अधिक तपास करीत आहेत.