आटपाडी तालुक्यात युवतीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:31 IST2021-09-12T04:31:43+5:302021-09-12T04:31:43+5:30

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन युवतीवर लॉजवर नेऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. बलात्कारानंतर पीडित युवतीस ...

Rape of a girl in Atpadi taluka | आटपाडी तालुक्यात युवतीवर बलात्कार

आटपाडी तालुक्यात युवतीवर बलात्कार

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन युवतीवर लॉजवर नेऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. बलात्कारानंतर पीडित युवतीस लग्नास हाेकार देण्यासाठी धमकावल्याबद्दल बलात्कारी तरुणासह त्याच्या वडिलांविराेधात आटपाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने तक्रार दिली आहे.

आटपाडी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या युवकाने गावातीलच अल्पवयीन मुलीस माेटारीतून आटपाडी-दिघंची रस्त्यावरील एका लॉजवर नेऊन नग्न छायाचित्रे व चित्रफीत बनवत जिवे मारण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तसेच संबंधित तरुणासह त्याच्या वडिलांनी पीडित युवतीच्या घरी येऊन ‘तू लग्नास होकार दे’ असे म्हणत धमकावले. याबाबत पीडित युवतीने आटपाडी पाेलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.

Web Title: Rape of a girl in Atpadi taluka