प्रेमसंबंध उघड करण्याच्या धमकीने खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:24 IST2021-02-15T04:24:02+5:302021-02-15T04:24:02+5:30
सांगली : प्रेमसंबंध उघड करण्याची धमकी देत दीड लाखाची खंडणी मागणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ...

प्रेमसंबंध उघड करण्याच्या धमकीने खंडणी
सांगली : प्रेमसंबंध उघड करण्याची धमकी देत दीड लाखाची खंडणी मागणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी इम्रान मुश्ताक नायकवडी (रा. शामरावनगर, सांगली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादीच्या नातेवाइकासोबत गेल्या सात ते आठ वर्षांपासून प्रेमसंबंध असून, त्याचे पुरावेही असल्याची धमकी संशयित देत होता. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता. या कालावधीत संशयित फिर्यादीच्या घरी आला व त्याने प्रेमसंबंधांचे पुरावे, रेकॉर्डिंग व फोटो माझ्याकडे आहेत. ते कोणाला द्यायचे नसतील तर मला दीड लाख रुपये द्यावेत, अशी मागणी त्याने केली. त्याचबराेबर पैसे न दिल्यास कुटुंबीयांना ठेवणार नाही, अशी धमकी देत तो वारंवार खंडणी मागत असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार नायकवडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.