रांजणीत तलाठी पोलीसास धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST2021-06-20T04:19:00+5:302021-06-20T04:19:00+5:30
शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता रांजणी येथील गायरानमध्ये राहुल पवार बेकायदा मुरुम उत्खनन करत होते. यावेळी तलाठी धनवे यांनी जेसीबी ...

रांजणीत तलाठी पोलीसास धक्काबुक्की
शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता रांजणी येथील गायरानमध्ये राहुल पवार बेकायदा मुरुम उत्खनन करत होते. यावेळी तलाठी धनवे यांनी जेसीबी व डंपर चालक यांना मुरुम उत्खन्नाची परवानगी काढली आहे का? अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले. त्यानंतर तेथील वाहने तहसीलदार कार्यालयात घेऊन चला असे सांगितले. परंतु जेसीबी मालक राहुल पवार याने तलाठी धनवे व पोलीस नाईक अविनाश शिंदे यांना धक्काबुक्की करून डंपर व जेसीबी घेऊन तेथून पळून गेले.
कवठेमहांकाळ पोलिसांनी याप्रकरणी सरकारी कामांत अडथळा आणला म्हणून राहुल पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. राहुल पवार अद्याप फरार असून कवठेमहांकाळ पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ पोलीस करत आहेत.