साधुग्राममध्ये रामपदारथदासांचे उपोषण
By Admin | Updated: September 29, 2015 22:46 IST2015-09-29T22:45:30+5:302015-09-29T22:46:32+5:30
साधुग्राममध्ये रामपदारथदासांचे उपोषण

साधुग्राममध्ये रामपदारथदासांचे उपोषण
नाशिक : साधुग्राममधील निर्मोही आखाड्यात महंत रामपदारथदास बाबा महात्यागी यांनी चोरी झालेल्या ३० लाख रुपये किमतीच्या ऐवजांचा पोलिसांनी तपास न लावल्याच्या निषेधार्थ सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
पर्वणीच्या दुसऱ्या दिवशी १९ सप्टेंबरला चोरट्यांनी रविवार कारंजा परिसरात एटीएममधून पैसे काढल्यानंतर जात असताना, गाडीवर मागच्या बाजूने गोळीबार करून आवाज केला. आवाज आल्याने गाडी थांबविली असता, त्यातील अडीच लाख रुपयांची रोख रकमेची पिशवी चोरून नेल्याचा दावा रामपदारथदास यांनी केला आहे. त्या घटनेला दहा दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही पोलिसांनी कोणताही तपास न केल्याने उपोषणाला बसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पंचवटी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली आहे. मात्र चोरट्यांचा अद्याप कोणताही तपास लागलेला नाही. रोख रकमेसह सोन्याची हनुमान देवतेची मूर्ती व हिऱ्यांची चोरी झाल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पोलिसांनी जलद गतीने तपासाची चक्रे फिरवून चोरट्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र पोलिसांकडून दुर्लक्ष होत आहे.
साधुग्राममध्ये चोरट्यांनी साधू-महंतांच्या विविध वस्तंूसह पैशांचीही चोरी केली. त्यामुळे साधू-महंतांकडून नाराजी व्यक्तकरण्यात आली होती. पोलिसांचा मोठा फौज फाटा साधुग्राममध्ये असतानाही त्याठिकाणच्या चोरीच्या घटना कमी झालेल्या नव्हत्या. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी पर्वणी साधली. साधंूसह परराज्यांतील भाविकांना चोरीचा फटका सर्वाधिक बसला आहे. (प्रतिनिधी)
- साधुग्राममध्ये चोरट्यांनी साधू-महंतांच्या विविध वस्तूंसह पैशांचीही चोरी केली. त्यामुळे साधू-महंतांकडून नाराजी व्यक्तकरण्यात आली होती. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी पर्वणी साधली. साधूंसह परराज्यांतील भाविकांना चोरीचा फटका सर्वाधिक बसला आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली आहे. मात्र चोरट्यांचा अद्याप कोणताही तपास लागलेला नाही.