‘गणेश नागरी’च्या अध्यक्षपदी रामनारायण उंटवाल बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:27 IST2021-05-19T04:27:14+5:302021-05-19T04:27:14+5:30

फोटो - १८०५२०२१-आयएसएलएम- राजेंद्र मळणगावकर लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : येथील श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रामनारायण उंटवाल ...

Ramnarayan Untwal unopposed as the president of 'Ganesh Nagari' | ‘गणेश नागरी’च्या अध्यक्षपदी रामनारायण उंटवाल बिनविरोध

‘गणेश नागरी’च्या अध्यक्षपदी रामनारायण उंटवाल बिनविरोध

फोटो - १८०५२०२१-आयएसएलएम- राजेंद्र मळणगावकर

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : येथील श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रामनारायण उंटवाल व उपाध्यक्षपदी राजेंद्र अच्युतराव मळणगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऊर्मिला राजमाने यांनी काम पाहिले.

सुभाषचंद्र झंवर म्हणाले, संस्थेच्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत १० शाखा कार्यरत असून संस्थेच्या ठेवी १५४ कोटी, कर्ज वाटप ११६ कोटी, वसुली भागभांडवल ५ कोटी ७५ लाख, स्वनिधी २३ कोटी, गुंतवणूक ६३ कोटी असून संस्थेला मार्चअखेर ३ कोटी ३५ लाख नफा झाला आहे.

यावेळी संचालक धनपाल चौगुले, अजिज मुजावर, शिवाजीराव शिंदे, विठ्ठल तळवलकर, दीपक साठे, भाऊसाहेब लोहार, राजाराम शेळके, अनुराधा झंवर, गणपती जाधव, सर्जेराव तांबेकर व मुख्य व्यवस्थापक एन. बी. काळोखे उपस्थित होते.

चौकट :

संस्थापक संचालक माजी अध्यक्ष अच्युतराव मळणगावकर यांच्या पश्चात त्यांचे पुत्र उद्योजक राजेंद्र यांना प्रथमच उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.

Web Title: Ramnarayan Untwal unopposed as the president of 'Ganesh Nagari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.