रामदेव सावंत यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:33 IST2021-06-09T04:33:46+5:302021-06-09T04:33:46+5:30

फोटो: कृष्णा नागरी ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्थेचे कर्मचारी रामदेव सावंत यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करताना मानसिंग बँकेचे अध्यक्ष सुधीर ...

Ramdev Sawant felicitated | रामदेव सावंत यांचा सत्कार

रामदेव सावंत यांचा सत्कार

फोटो: कृष्णा नागरी ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्थेचे कर्मचारी रामदेव सावंत यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करताना मानसिंग बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव व संस्थेचे पदाधिकारी.

दुधोंडी : दुधोंडी (ता. पलुस) येथील कृष्णा नागरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी रामदेव सावंत यांचा सेवानिवृत्तीनिमित्त मानसिंग बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव यांनी सत्कार केला.

सुधीर जाधव म्हणाले की, रामदेव सावंत यांनी

त्यांच्या २४ वर्षांच्या सेवाकाळात सामाजिक बांधिलकी जपत निष्कलंक सेवा बजावली. त्यांनी नेहमी ग्राहक हित जपत सर्वांशी आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले. कृष्णाकाठ उद्योग समुहात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पाठीशी उद्योग समूह खंबीरपणे उभा राहिला आहे.

यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष डॉ. नागराज रानमाळे, पलुस मार्केट कमिटीचे सभापती सुनील नलवडे, उपसरपंच रवींद्र नलवडे, भालचंद्र आरबुणे, दिनकर आरबुणे, शिवाजी सुळे, सचिव शंकर जाधव, जगदीश तिरमारे, राकेश तिरमारे, रुपेश तिरमारे उपस्थित होते.

Web Title: Ramdev Sawant felicitated