शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली धरणाची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे-: राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मातीचे धरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 01:01 IST

देशात संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविली जात आहे. मात्र, शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देसीसीटीव्ही, पथदिवे बंद ; शासनाने गंभीर दखल घेण्याची गरज

गंगाराम पाटील ।वारणावती : देशात संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविली जात आहे. मात्र, शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. येथील पथदिवे आणि सीसीटीव्ही बंद असून धरणाची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदोली धरण ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे राज्यातील मातीचे सर्वांत मोठे धरण आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणारे हे जंगलातील व डोंगर-दऱ्यातील धरण आहे. जवळच चांदोली राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्प असल्याने हा परिसर संवेदनशील आहे.नुकत्याच घडलेल्या पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या धरण परिसरात अखंड वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, सीसीटीव्ही कॅमेरे सुरू ठेवावेत व कडक सुरक्षा व्यवस्था ठेवणे गरजेचे आहे. या धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने परिसरात कोणत्याही प्रकारची चोख व्यवस्था नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील उदगिरी, धनगरवाडा, अंबाईवाडी, तनाळी या परिसरातून, तर शिराळा व पाटण तालुक्यातील डोंगर-दºयातून धरणाच्या परिसरात सहज प्रवेश करून माहिती घेऊन कधीही शत्रूकडून धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे चारही बाजूंनी धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शासनाने पाऊल उचलले पाहिजे.दिव्याखाली अंधारएवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साठवण क्षमता असलेल्या चांदोली धरणाच्या पाण्यावर १६ मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते, तर नव्यानेच कार्यान्वित झालेल्या सोनवडे जलविद्युत प्रकल्पातून ४ मेगावॅट वीज निर्मिती होते. एकूण २० मेगावॅट विजेची निर्मिती या धरणाच्या पाण्यावर केली जाते. पण या धरणाच्या माथ्यावरील पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या चार महिन्यांपासून बंद आहेत. धरण प्रशासन गांधारीची भूमिका घेत आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे कळविले असल्याचे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात दिव्याखाली अंधारच दिसत आहे.परिसर संवेदनशीलपावसाचे आगर समजल्या जाणाºया या परिसरात धुवांधार पाऊस पडतो. वार्षिक साडेतीन ते चार हजार मिलिमीटर पाऊस पडतो. सभोवताली डोंगर-दºया, घनदाट जंगल, तसेच शेजारी चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. दुर्गम असला तरी हा परिसर संवेदनशील असल्याने सुरक्षा व्यवस्था मजबूत असण्याची गरज आहे.पोलीस चौक्यांचीही दुरवस्थाचांदोली धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने पायथ्याजवळ पोलीस कर्मचाऱ्यांसाठी चौक्या उभारण्यात आल्या आहेत. या चौक्यांना अद्याप विद्युत व पाणी पुरवठा दिलेला नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना अंधारात व उघड्यावरच धरणाचे रक्षण करण्यासाठी धडपड करावी लागत आहे.

टॅग्स :Damधरण